जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला मोठी गाडी घेण्यासाठी माहेरहून २ लाख रूपये आणावे अशी मागणी करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी १ मे रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर येथील माहेर असलेल्या विवाहिता सोनाली चेतन चौधरी (वय-२८) यांचा विवाह जळगाव तालुक्यातील आसोदा येथील चेतन भास्कर चौधरी यांच्याशी झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेने माहेरहून दोन लाख रूपये आणावे अशी मागणी केली. परंतू विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. पैसे आणले नाही म्हणून सासू, सासरे, नणंद यांनी छळ करण्यास सुरूवात केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी आसोदा येथे निघून आल्या. याप्रकरणी सोमवारी १ मे रोजी रात्री ८ वाजता विवाहितेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती चेतन भास्कर चौधरी, सासरे भास्कर रामा चौधरी, सासू उज्वला भास्कर चौधरी, देवयानी भास्कार चौधरी सर्व रा. आसोदा ताजि.जळगाव, नणंद सपना सचिन पाटील, सचिन किरण पाटील दोन्ही रा. अयोध्या नगर, जळगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील करीत आहे.