धरणगाव प्रतिनिधी । दोन महिलांना अश्लिल शिवीगाळ व बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील पाळधी येथे घडली होती. यातील संशयित आरोपीला पाळधी पोलीसांनी आज अटक केली आहे. पाळधी पोलीसात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , २१ मे २०२१ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाळधी येथील हॉटेल हिमालयच्या ओट्यावर बसलेल्या सचिन चौधरी (पूर्ण नाव माहीत नाही ) याने कारण नसताना एका महिलेला अश्लील शिवीगाळ करून ‘तू पंजाबी ड्रेस का घातला’ असे म्हणत तिला लाकडी दांडक्याने डोक्यावर मारून गंभीर दुखापत करून पोट, छाती, पाठीवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली . यावेळी मारहाण का करतो म्हणून आलेल्या तक्रारदार दुसऱ्या महिलेस शिवीगाळ करून तिच्या डोक्यावर दांडक्याने वार करण्याचा प्रयत्न केला असता सदर महिलेने तो वार चुकविला असता तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूस आणि बोटाना मार लागला. याबाबत महिलेने पाधळी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी सचिन चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ अरुण निकुंभ करीत आहे.