Home Cities धरणगाव दोनगाव येथे बांधावर खत वाटप योजनेचा शुभारंभ

दोनगाव येथे बांधावर खत वाटप योजनेचा शुभारंभ

0
46

 

दोनगाव ता.धरणगाव । येथील निळकंठेश्वर कृषी विज्ञान मंडळ व शिव ऍग्रो सेल्स पाळधी यांच्या संयुक्त विद्यमाने ,बांधावर खत वाटप योजना सन २०२०-२१ अंतर्गत बांधावर खत व बियाणे वाटपाचा करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

भविष्यात सर्व खरेदी गटांमार्फत व्हावी जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या ,बियाणे ,खते बाजार भावापेक्षा किंमतीपेक्षा कमी भावात व घरपोच मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होईल असे देखील सांगण्यात आले. याप्रसंगी दोनगावमधील शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी देखिल या योजनेचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास जि. प. सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील , कृषी पर्यवेक्षक ईश्वर पवार, शिव ऍग्रो सेल्सचे संचालक ,सचिन पाटील , निलकंटेश्वर कृषि विज्ञान मंडळाचे अध्यक्ष अमोल पाटील, सचिव देविदास पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.


Protected Content

Play sound