पाचोरा, प्रतिनिधी ! नगरदेवळा येथील शेतकऱ्यास. ५ सप्टेंबर २०१६ रोजी दोघांनी मारहाण करून जखमी केल्याने पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ५ वर्षांनंतर निकाल लागून येथील न्या एफ के सिद्दीकी यांनी दोघा आरोपींना ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे
या आरोपीना भा. द. वी. कलम ३२४ /३४ प्रमाणे दोषी ठरवण्यात आले भरपाई म्हणून ५ हजार रुपये दंड देण्याची व एक वर्ष चांगल्या वर्तवणुकीसाठी निरीक्षणाखाली ठेवण्याची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील जयंत दिवटे यांनी युक्तिवाद केला होता.
नगरदेवळा येथील रमेश चौधरी यांना त्यांच्या निपाने शिवारातील शेताच्या बांधावरील झाडाचे नुकसान झालेले दिसले बांध खोदलेला दिसला या कारणावरून रमेश चौधरी याने ठेंगा सोसायटी कार्यालयाजवळ गेल्यावर येथील पुना गढरी (वय – ५७) व रवींद्र गढरी (वय – २३) यांनी तुझे काय नुकसान झाले असे संबोधून तोंडावर व उजव्या पायावर दगड मारून दुखापत केली होती.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी वकील जयंत दिवटे यांनी सहा साक्षीदार तपासले होते. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक जिजाबराव पवार यांनी केला होता.