हैदराबाद वृत्तसंस्था । देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आटोक्यात आहे. तर दुसरीकडे कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत २७ हजार ११४ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधितांचा आकडा आता ८ लाख २० हजार ९१६ वर पोहोचला आहे.
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. शनिवारी दिवसभरात देशात एकुण २७ हजार ११४ नवे रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. २२ हजार १२३ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
महाराष्ट्रात ८ हजाराहून अधिक नवे रूग्ण
राज्यात शनिवारी ११ जुलै राेजी ८ हजार १३९ नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली असून बाधितांची एकूण संख्या आता २ लाख ४६ हजार ६०० वर पोहोचली आहे. शनिवारी 4 हजार 360 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शनिवारपर्यंत 13 लाख 6 हजार 985 जण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहे. राज्यात सध्या 99 हजार 202 सक्रिय (अॅक्टिव्ह) रुग्णांवर राज्यातील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.