नवी दिल्ली : वृत्तसंस्था । शुक्रवारी सलग दुसर्या दिवशी देशात दोन लाखांहूनही कमी म्हणजे १.७३ लाख नवीन कोरोना रुग्ण आढळले. गेल्या ४५ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. या कालावधीत ३६१७ लोकांनी जीवही गमावला आहे.
डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या सलग १६ व्या दिवशी बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे. एका दिवसातच २.४८ लाख रुग्ण बरे झाले आहेत. भारतात सध्या रिकवरी रेट ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि तो वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतात सध्या एकूण २२,२८,७२४ सक्रिय रुग्ण आहेत.
१२ एप्रिल नंतर शुक्रवारी नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मृत्यूंची संख्या सध्याही चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रात १०,०२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये ४८६ लोकांचा मृत्यू झाला. तामिळनाडूत ३१,००० नवीन रुग्ण आढळले. तर कर्नाटकमध्ये २३,००० बाधित आढळले
साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण सुरू आहे. मात्र लशींचा तुटवडा असल्यामुळे देशात अनेक राज्यातील लसीकरण केंद्र बंद पडले आहेत.