नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात १३ नवे कोरोना व्हायरस बाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत या विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ७३ वर पोहोचली आहे.
माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहिती नुसार महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. आज मुंबईत हिंदुजा रुग्णालयात एका रुग्णाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत पदेशातून ९४८ प्रवाश्यांना मायदेशात आणले आहे. यात ९०० भारतीय आणि ४८ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, इराणमध्ये अडकलेल्या १२० भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान आज जैसलमेर इथे उतरणार आहे. दरम्यान, दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि सरकारतर्फे योग्य त्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.