देशभरातील हिंदूंची हत्या रोखण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करा

 

जळगाव, प्रतिनिधी  दिल्ली आणि केरळ यांसह देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी तसेच दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून सखोल तपास करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. 

गेल्या काही वर्षात देशभरात हिंदुत्ववादी संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक हल्ला करणे, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे, तसेच त्यांना ठार मारणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. याला आळा घालतांना दिल्ली आणि केरळ यांसह देशभरात गेल्या काही वर्षात झालेल्या हिंदूंच्या हत्या मागील सूत्रधार. यात सहभागीगुन्हेगार, या हत्यांमध्ये सहाय्य करणार धर्मांध यांच्यावर तसेच ही प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणारे पोलीस व राजकीय नेते याचा मग काढून त्यांच्यावर कारवाई व्हावी. अशा प्रकरणांची चौकशी करण्यास राज्य शासन अपयशी ठरत असल्याने या घटनांचा तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे द्यावा. तपासासाठी कार्यकाळ निश्चित करण्यात यावा. देश्भरातील हिंदुत्ववादी नेत्यांना तत्काळ राज्यात व राज्याबाहेर केंद्र सरकाने सुरक्षा पुरविण्याचे आदेश देण्यात यावेत आदी मागणी निवेदनाद्वारे हिंदू जनजागृती समितीतर्फे श्रेयश मिसोळकर यांनी केली आहे. 

Protected Content