पारोळा : प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी देवयानी माळी हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शिक्षक सेनेच्यावतीने नितीन बानुगडे पाटील व शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ना. ज. मो. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा व कोल्हापूर जिल्ह्याच्यावतीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. परदेशातून तसेच राज्यातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत एकूण चार गट होते त्यात प्रथम गटात राज्यात कु. देवयानी चंद्रकांत माळी (इयत्ता २, री) या विद्यार्थिनीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला उत्तर महाराष्ट्र , जळगाव जिल्ह्यातून व राज्यातून तिच्या चित्राची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली, त्याबद्दल तिचे सर्वत्र पारोळा नगरीत कौतुक होत आहे
श्री बालाजी प्राथमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष उमेश करोडपती व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक हेमंत कुमार बी. पाटील मुख्याध्यापक डॉ. व्ही . एम. जैन , माध्यमिक विद्यालयाचे विजय बडगुजर यांनीही या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले
या विद्यार्थिनीला राज्यस्तरीय पारितोषिक म्हणून प्रमाणपत्र व ५०१ रुपये रोख बक्षीस देण्यात आले . शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, शिक्षक सेना तालुकाध्यक्ष अनिल चौधरी, बापू महाजन, विक्रांत पाटील , मनवंत साळुंखे, लक्ष्मीकांत पाटील, बालाजी शाळेचे प्रतिनिधी धनेश पाठक यांनी घरी जाऊन देवयानी चंद्रकांत माळी या विद्यार्थिनीचा सत्कार केला यावेळी तिचे आई वडील उपस्थित होते.