Home Cities अमळनेर देवगाव देवळी येथे ९० गरजू कुटुंबांना तांदुळ वाटप

देवगाव देवळी येथे ९० गरजू कुटुंबांना तांदुळ वाटप


अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील देवगाव देवळी येथे योग वेदांत सेवा समिती व महात्मा फुले ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ९० कुटुंबांना तांदुळ वाटप करण्यात आले.

संपूर्ण देशभरात कोरोना महामारिने एकीकडे धुमाकूळ घातल्याने लॉकडाउन काळात सर्व सामान्य जनतेचा रोजगार बंद पडले आहेत. रोजगार बुडालेल्या बांधकाम मजूर, झोपडपट्टी वसाहतीत राहणारे गोरगरीब वृद्ध नागरिक, शेतमजुरी, घरकाम करण्याऱ्या गृहिणी याना मोफत २ किलो तांदुळाचे तब्बल ९० पाकिटे ९० कुटुंबीयांना योग वेदांत सेवा समिती व महात्मा फुले ब्रिगेडतर्फे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ.अनुप महाजन, मनिकांत शर्मा, सूर्यकांत पाटील, महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन, भटू माळी, मयुर पाटील, सचिन पाटील आदि उपस्थित होते.


Protected Content

Play sound