अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये स्वातंत्र्याचा महोत्सव निमित्ताने १४ ऑगस्टला माजी सैनिक मुकेश पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी ध्वजगीत सादर केले. यावेळी शाळेचे शिक्षक आय.आर महाजन यांनी पर्यावरणाची शपथ विद्यार्थी व शिक्षकांना देण्यात आली. शाळेचे संचालन स्काऊट शिक्षक एस के महाजन यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी प्रस्ताविक केले. यावेळी शाळेचे शिक्षक आय आर महाजन ,एच.ओ माळी, अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.