जळगाव प्रतिनिधी । जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक संजयकुमार गौतम यांचा राजीनामा वादाच्या भोवर्यात सापडला असून यावरून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.
जिल्हा दूध संघाच्या १ फेब्रुवारी रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कार्यकारी संचालकांवर (एमडी) कारवाईचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापूर्वीच कार्यकारी संचालक संजयकुमार गौतम यांनी राजीनामा दिल्याचा दावा संचालक मंडळाकडून करण्यात आला आहे. तर काही चुकीच्या गोष्टींना विरोध केल्यामुळे राजकीय दबाव आणून माझ्याकडून राजीनामा घेण्यात आल्याचा आरोप एमडी गौतम यांनी केला आहे. मार्केटिंग आणि खरेदी संदर्भात काही बाबींवर मी आक्षेप घेतला होता. मी राजीनामा दिलेला नसून, मला राजकीय दबावातून राजीनामा देण्यास भाग पाडले असल्याचे ते म्हणाले.