नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोना लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यात पंतप्रधान मोदी यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व पन्नाशी पार केलेल्या महत्वाच्या लोकप्रतिनिधींना लस दिली जाणार आहे.
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री लस टोचून घेणार आहेत. तसेच वयाची पन्नाशी गाठलेल्या सर्व आमदार आणि खासदारांनाही कोरोनाची लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पन्नासीच्या पुढच्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्यामुळे पन्नाशीच्या पुढील सर्व खासदार आणि आमदारांना कोरोनाची लस टोचण्यात येणार आहे. या टप्प्यात स्वत: मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारीही लस टोचून घेणार आहेत.