पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील लोहारगल्लीतून एकाची दुचाकी लांबविणाऱ्या दोन चोरट्यांना पारोळा पोलीसांनी अटक केली आहे. दोघांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील लोहारगल्लीत राहणारे अनिल नारायण लोहार यांचे अंगणात पार्किंगला लावलेली दुचाकी (एमएच १९ डीएफ ९९८३) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी सचिन पंडित चौधरी (वय-32)] स्वामी सुरेंद्र लक्ष्मण चौधरी (वय-१९) दोघा रा. शेवडे गल्ली पारोळा यांनी पारोळा पोलीसांनी अटक केली आहे. दोघांनी दुचाकी चोरीचा गुन्हा कबुल केला आहे. दरम्यान चोरीची दुचाकी ही धुळ्यातील निखिल राजेंद्र चौधरी याला दहा हजारा विकल्याचे सांगितले. त्याला देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. तिघांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नाना पवार, पोना संदीप सातपुते, पोकॉ किशोर भोई, पोकॉ अभिजित पाटील, पोकॉ राहुल कोळी, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ हेमचंद्र साबे यांनी केला आहे.