एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीला कट मारल्याच्या संशयावरून बसचालकाला मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एरंडोल तालुक्यातील भातखेंडा येथे घडला आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता एरंडोल तालुक्यातील भातखेंडा येथील बसस्थानकाजवळ एरंडोल ते उत्राण जाणारी बस क्रमांक (एमएच ०६ एस ८६२३) जात असताना दुचाकीधारक समाधान लक्ष्मण गोसावी रा. नेर बराणपुर मध्य प्रदेश ह.मु.भातखेडा ता. एरंडोल याने दुचाकी थांबवून बसने दुचाकीला कट मारल्याच्या संशयावरून बसचालक साहेबराव मार्तंड महाजन रा. विखरण ता. एरंडोल यांना शिवीगाळ करून चट्टाबक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत बस चालक साहेबराव मार्तंड महाजन यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दुचाकी समाधान लक्ष्मण गोसावी यांच्या विरोधात कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे करीत आहे.