जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकी घसरून अपघात झाल्याने जखमी असलेल्या जळगाव तालुक्यातील किनोद येथील १५ वर्षीय मुलाचा जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवार, १ मे रोजी मृत्यू झाला आहे. सुमित ज्ञानेश्वर सपकाळे (वय-१५) रा. किनोद ता. जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार असे की, सुमित सपकाळे हा २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होता. यादरम्यान दुचाकी घसरून पडल्याने त्याचा अपघात झाला. अपघातानंतर घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनी समिती याला जळगाव शहरातील ओम क्रिटिकल केअर ड्रामा सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना सोमवारी १ मे रोजी दुपारी सुमित याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास शिंदे करीत आहेत.