जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या कानळदा रोडवरील के.सी.पार्क जवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत गुरूवारी २ मार्च रोजी दुपारी ४ वाजता पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून कानळदा येथील के.सी.पार्क जवळ मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत गणेश सोमा सपकाळे (वय-३२) रा. आमोदा खुर्द ता.जि.जळगाव याचा जागीच मृत्यू झाला होता तर अमोल प्रकाश विसपूते (वय-३०) रा. कांचन नगर, याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर समाधान बाविस्कर रा. आमोदा खुर्द ता.जळगाव व जितेंद्र एकनाथ चौधरी रा. कांचन नगर, हे दोघे जखमी झाले होते. जखमींना खासगी रूग्णालयात उपारार्थ दाखल करण्यात आले. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कांचन नगरातील मित्र परिवार व नातेवाईकांनी रूग्णालयात मोठी गर्दी केली होती. या घटनेबाबत पोहेकॉ रविंद्र सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवारी २ मार्च रोजी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल करीत आहे.