चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान अचानक दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हर्षल चंद्रभान चौधरी हा चुलत भाऊ सागर रवींद्र चौधरी (वय-३०) रा. जुना मालेगाव रोड, चाळीसगाव याचे धुळे रोडवरील हॉटेल साई पॅलेसचे सुरू असलेला काम पाहण्यासाठी सोमवार (ता.७) रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गेला. पाहून झाल्यावर सागर व हर्षल दोन्ही स्वतंत्र दुचाकीने घरी येण्यासाठी निघाले. मात्र चाळीसगाव-धुळे रोडवरील पुन्शी पेट्रोल पंपासमोर महादेव मंदिराकडून येणाऱ्या भरधाव मोटारसायकलने (क्र. एम.एच. १९ बीए २६१३ ) हर्षल चौधरी याच्या होंडा कंपनीची शाईन दुचाकीला (क्र. एम.एच. १९ बीए १८७७) रात्री ९ वाजताच्या सुमारास जोरदार धडक दिली. यात हर्षलला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढे डॉक्टरांच्या सल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सागर रवींद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसात चालक रुपसिंग बाबू जाधव रा. कृष्णापुरी तांडा लोंढे ता. चाळीसगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले होते. व पुढील तपास सुरु होता. मात्र धुळे येथील रूग्णालयात हर्षलवर उपचार सुरू असताना अचानक आज उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.