जळगाव प्रतिनिधी । शहरातील व्यापाऱ्याच्या डिक्कीतून १ लाख ६० हजार रूपयांची रोकड अज्ञात व्यक्तीने लांबविल्याची घटना शनी मंदीराजवळ घडली. याप्रकरणी व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, कमलेश विशनदास लालवाणी (वय-३५) रा. गणपती नगर हे व्यापारी आहे. ३० जानेवारी रोजी रात्री ९ .२० वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने (एमएच १९ सीक्यू ७७८७) क्रमांकाच्या दुचाकीच्या डिक्कीत १ लाख ६० हजार रूपयांची रोकड घेवून गावातील पांडे चौकाजवळील जागृती हॉस्पिटलसमोरील शनीमंदीराजवळ आले. शनी मंदीरात दर्शन घेण्यासाठी दुचाकी पार्कीग करून लावली होती. अज्ञात व्यक्तीने दुचाकीची डिक्की तोडून डिक्कीत ठेवलेले १ लाख ६० हजार रूपये ठेवलेली पिशवी चोरून नेले. त्यात दोन बँकेचे एटीएम कार्ड, दुकानाच्या चाव्या व ड्रायव्हींग लायसन्स देखील होते. दर्शन घेवून दुचाकीजवळ आले असता डिक्कीतून रोकड लंपास केल्याचे दिसून आले. याप्रकरणी कमलेश लालवाणी यांनी जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहे.