दुकानदाराला ग्राहकाची शिवीगाळ : धमकावून साड्या चोरल्या

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गांधी मार्केट समोरील साडीच्या एका दुकानदाराला ग्राहकाने शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत दुकानातील १ हजार ७०० रूपये किंमतीच्या साड्या जबरदस्ती चोरून नेल्याची घटना १७ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गांधी मार्केट समोरील गुलशन साडीच्या दुकान अशोक कुमार सनमुखदास राजपाल (वय-६५ ) रा. संत बाबा हरीदास राम सोसायटी जळगाव यांचे दुकान आहे. गुरुवार १७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सुरेश पुंडलिक ठाकरे रा. जैनाबाद यांच्या अनोळखी व्यक्ती दुकानावर आहे. साडी घेण्याच्या बहाण्याने दुकानात बळजबरी घुसले. दुकानदार अशोक कुमार राजपाल यांना काहीही एक कारण नसतांना सुरेश ठाकरे यांच्यासह इतर अनोळखी दोन जणांनी शिवीगाळ केली. व दुकानातील १ हजार ७०० रूपये किंमतीच्या दोन साड्या चोरून नेल्या. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सुरेश ठाकरे यांच्यासह इतर अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी सुरेश ठाकरे याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार वासूदेव सोनवणे करीत आहे.

Protected Content