भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दीपनगर येथील वीज निर्मिती प्रकल्पातील हायड्रोजन विभागात एका कंत्राटी कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती असे की येथील सँनड्राज कंपनीतील कामगार भरत तायडे (वय ४५, राहणार कंडारी) याने कामावर असतांना दुपारी दोन ते रात्री दहाच्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. रात्री दहाच्या नंतर दुसर्या पाळी वर आलेल्या कामगार याला दिसल्या नंतर त्याने सुरक्षा व्यवस्थापक याना माहिती दिली. तायडे याने आत्महत्या का केली याबाबत माहिती मिळू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, ताज्या माहितीनुसार त्याच्या मृतदेहाचे आज सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार असून यासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.