श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये आता सर्व भागात फोर – जी इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या सूचना विभागाचे प्रधान सचिव रोहित कन्सल यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
ऑगस्ट २०१९ मध्ये कलम-३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या सर्वच भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. पुढे टू -जी इंटरनेट सेवा सुरु केली होती. जम्मूमधील उधमपूर, तर काश्मीरमधील गंदेरबल या जिल्ह्यांमध्ये वर्षभरानंतर फोर -जी इंटरनेट सेवा सुरु केली होती. पण अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र आतापर्यंत ही सेवा सुरु करण्यात आली नव्हती
इंटरनेट सेवा सुरु केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट केलंय. “फोर -जी मुबारक! देर आये, दुरुस्त आये!” , असं अब्दुल्ला म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये रक्त गोठवणारी थंडी आहे. अशावेळी लोकांकडे इंटरनेट सेवा नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं.