दिवाळीत गरजवंताला धन्य उपलब्ध करण्याची निवेदनाद्वारे मागणी!

खामगाव, प्रतिनिधी| दिवाळीच्या पाश्वभूमीवर गरजू रेशनकार्ड धारकांना धन्य उपलब्ध करून गरजवंताला नवीण रेशन कार्ड देण्याची मागणी प्रदेश कॉंग्रेस कमीटीचे सचिव धनंजय देशमुख यांची अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

बुलडाणा जिल्हयात प्राप्त होणाऱ्या अतिरिक्त धान्यसाठ्यामधुन अन्नसुरक्षा योजनेत समावेश करुन खामगाव तालुक्यात दिवाळी सणानिमित गरजू रेशनकार्ड धारकांना धन्य उपलब्ध करून गरजवंताला नवीण रेशन कार्ड द्या अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस कमीटीचे सचिव धनंजय देशमुख यांनी  अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात खामगाव शहरासह तालुक्यामध्ये अनेक नागरीकांनी  आठ ते नऊ वर्षापासून रेशन कार्ड काढले आहे. तरीही त्या रेशन कार्डवर त्यांना धान्य पुरवठा सुरुळीत होत नाही. मात्र प्रशासनाने यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केल्याचे अद्याप दिसुन आले नाही. नागरिक हे कुटुंबापासुन विभक्त  झाल्यानंतर त्यांना नविन रेशनकार्ड मिळत नाही.  तसेच नागरीक मयत झाले किंवा काही मुलींचे लग्न झाल्यानंतर सदरच्या रेशन कार्ड मध्ये हा पुरवठा सुरु राहतो. मात्र सदर कुटुंबाला तो मिळत नाही. सदरचा धान्यसाठा हा अतिरिक्त ठरतो. त्यामधुन पुरवठयाचे नियोजन करून त्यात त्यामध्ये नवीन रेशन कार्ड धारकांचा समावेश करून धान्य पुरवठा सुरू करणे अपेक्षित आहे. परंतु पुरवठा विभागाने सदरचे काम केलेले नसल्यामुळे खामगाव शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक केशरी शिधा पत्रिकाधारक धान्यापासुन वंचित आहेत. खामगाव तालुक्यामध्ये हजारो क्विंटल धान्य साठा अतिरिक्त ठरतो. त्यामुळे त्या अतिरिक्त धान्य साठ्यातून नवीन रेशन कार्ड सुरू व्हावे. तसेच गरज पडल्यास जिल्हा पुरवठा विभागाने यासंदर्भात आणखी विशेष मोहीम राबवून खामगाव शहर व ग्रामीण भागातुन ज्या ठिकाणाहुन मागणी येईल त्या गावांमधील गरजू रेशन कार्डधारकांना तात्काळ धान्य उपलब्ध करुन द्यावे. कारण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी मुळे सर्व काही उद्योग धंदे ठप्प पडले आहे. गेल्या दोन वर्षात  कोरोनामुळे उद्भवलेल्या मंदीच्या काळाने सर्वसामान्य माणसाची आर्थिक बाजू चांगलीच कमजोर झाली. तो या कोरोणाच्या संकटाशी तोंड देऊनही कसाबसा आज उभा राहिला आहे. त्यात वाढत्या महागाईचा फटका खाद्य तेलापासून ते ट्रान्सपोर्ट करणाऱ्या गाड्यांच्या पेट्रोल डिझेल यांच्या किमती मध्ये कमालीची वाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ निश्चित होणार. हे सुद्धा नाकारता येत नाही. अशा बिकट परिस्थितीमध्ये रेशन कार्डाच्या माध्यमातून मिळणाऱ्या अन्नधान्य याचा खूप मोठा आधार हा सर्व सामान्यांना आहे. दिवाळी सण हा तोंडावर आलेला असून अशावेळी सर्वसामान्यांना तसे केशरी कार्डधारकांना नियमित सुरळीत रेशनच्या दुकानातून अन्नधान्य हे योग्य रित्या दिल्या गेले पाहिजेत. तर काहींनी नवीन रेशन कार्ड ची मागणी केली असून त्यांना त्वरित रेशन कार्ड उपलब्ध करून दिले पाहिजेत. असे नमूद करण्यात आले आहे.

 

Protected Content