दिल्ली प्रतिनिधी । दिल्ली विधानसभेसाठी आज सकाळी मतमोजणी सुरू झाली असून यात आम आदमी पक्ष अर्थात आप आघाडीवर असल्याचा प्राथमिक कल समोर आला आहे.
दिल्लीतील ७० जागांसाठी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली आहे. यात पहिल्यांदा पोस्टल मते मोजण्यात आली असून यामध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष आघाडीवर असल्याचा कल दिसून आला आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसने आव्हान दिले आहे. या निवडणुकीचा निकाल हा अतिशय महत्वाचा असल्याने याकडे सर्व देशाचे लक्ष लागून आहे.
सकाळी एकूण 70 जागांचे कल समोर आले होते. यात आम आदमी पक्षाला 56 तर भाजपला 14 जागांवर आघाडी असल्याचे दिसून येत आहे.