दिल्ली येथील महिला पोलिसाचा खून करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । दिल्ली येथील महिला पोलीसावर अत्याचार करून तिचा निघृण  खून करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची मागणी सै. नियाज अली भैय्या मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे राष्ट्रपतींना जळगाव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत  निवेदन देवून करण्यात आली आहे. 

 

निवेदनाचा आशय असा की,  दिल्ली पोलीस दलात नोकरी करणाऱ्या २१  वर्षीय महिला पोलीस ही २७  ऑगस्टच्या संध्याकाळपासून बेपत्ता झालेली होती. तिचा शोध घेतल्यावर ती सापडून आलेली नव्हती. नंतर तिचा मृतदेह आढळून आलेला असून त्याच्यावर ५०  ठिकाणी चाकुचे वार करून तिचे दोन्ही स्तन हे कापुन टाकण्यात आलेले असून तिच्यावर सामुहिक बलात्कार सुद्धा झालेला आहे.  हे अत्यंत पाशवी व संतापजनक घटना असून आम्ही याचा निषेध करतो. तसेच हे वाईट कृत्य करणाऱ्या राक्षसांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, ही मागणी करतो. निवेदनावर सैयद अयाज अली नियाज अली, सुरज नारायण गुप्ता, शेख शफी, सैय्यद जावेद, शेख नाजीम, शेख जमील, शेख शब्बीर, शेख आतीक आदींची स्वाक्षरी आहे.    

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/551530469420131

 

Protected Content