दिल्ली दंगलीच्या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ ; काँग्रेसचे ७ खासदार निलंबित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली दंगलीच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या ७ खासदारांना निलंबित केले आहे.

 

लोकसभेत चुकीचे आचरण केल्याच्या कारणावरून सभापती ओम बिर्ला यांनी गौरव गोगोई, टीएन प्रथापन, डीन कुरियाकोस, आर उन्नीथान, मनिकाम टागोर, बॅन्नी बेहनन, गुरजीत सिंह अजुलिया यांना निलंबित केले आहे. दरम्यान, आपचे राज्य सभेतील खासदार संजय सिंह यांनी करोनाचे संकट पाहता संसद गेटवर देखील थर्मल स्कॅनर लावण्याची केली मागणी आहे.

Protected Content