नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली आणि आसपासच्या परिसरात आज (रविवार) दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल एवढी होती.
भूकंपविज्ञान केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी दिल्ली आणि नजीकच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची रिश्टर स्केलवर तीव्रता ३.५ एवढी होती. या भूकंपाचे केंद्र दिल्ली आणि उत्तर प्रदेशनजीकच्या सीमाभागात असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीही या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. दरम्यान, महिन्याभरात तिसऱ्यांदा या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.