नवी दिल्ली (वृत्तसंस्था) यापुढे मतदान त्यालाच दिले जाणार जो मोहल्ला क्लिनिक निर्माण करेल… यापुढे मतदान त्याला मिळेल जो 24 तास वीज पुरवठा करेल… आता मतदान त्यालाच मिळेल जो घरा-घरांमध्ये मोफत पाणी देईल. दिल्लीतील प्रत्येक नागरिकाचा आणि विकासाचा हा विजय आहे. ‘दिल्लीवालो, गजब कर दिया… आय लव्ह यू’ , अशा शब्दात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सलग तिसऱ्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी येताच भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद आणि वंदे मातरमचे नारे दिले. ‘दिल्लीवालो, गजब कर दिया… आय लव्ह यू’. दिल्लीतील प्रत्येक नागरिकाचा आणि विकासाचा हा विजय आहे. हा विजय केवळ दिल्लीचा नसून संपूर्ण देशाचा आहे. एकूणच दिल्लीच्या जनतेने देशवासियांना नवी उमेद दिली आहे. दिल्लीत तिसऱ्यांदा सत्ता स्थापित करू पाहणारे केजरीवाल यांच्या मते, दिल्लीकरांनी आज निवडणुकीच्या निमित्ताने नवीन राजकारणाला जन्म दिला. हेच राजकारण दिल्लीसह देशाला 21 व्या शतकात नेईल, असेही केजरीवाल म्हणाले.