नागपूर (वृत्तसंस्था) कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशांतता असलेल्या भागांमध्ये सरकारने शांतता प्रस्थापित केली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे.
भैय्याजी जोशी म्हणाले की, दिल्लीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी सरकारी आहे. सरकारने हे सुनिश्चित केले पाहिजे. असेच कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशांतता असलेल्या भागांमध्ये सरकारने शांतता प्रस्थापित केली पाहिजे असे भैय्याजी जोशी म्हणाले. दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन रविवारी रात्री उत्तर पूर्व दिल्लीच्या वेगवेगळया भागांमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला. बुधवारी रात्रीपर्यंत मृतांचा आकडा २७ पर्यंत पोहोचला होता.