दिल्लीकरांनी मोदींचे ऐकले म्हणून भाजपला नाकारले : नवाब मलिक

4Nawab Malik 14

 

मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की देशद्रोह्यांना मतदान करु नका, ते दिल्लीच्या जनतेने ऐकलं आणि देशद्रोही भाजपला नाकारले, अशा शब्दात हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

 

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरु झाली. मात्र सकाळी दहावाजेपर्यंत आलेल्या कलानुसार आपने ४९ जागांवर आघाडी मिळवत, बहुमताचा आकडा पार करतांना दिसत आहे. तर भाजपला २१ जागांपर्यंत पोहचली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशद्रोह्यांना मतदान करु नका, ते दिल्लीच्या जनतेने ऐकले आणि देशद्रोही भाजपला नाकारले. मोदींनी जनतेला जो सल्ला दिला होता तो जनतेने ऐकला. भाजपने दिल्लीत धार्मिक तेढ निर्माण केला. शाहीनबाग प्रकरणी देशद्रोही ठरवले. भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केले. मतदारांना पैसे वाटताना भाजपवाल्यांना पकडण्यात आले, तरीही भाजपचा पराभव झाला.

Protected Content