जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाले कोरोना अहवालात जिल्ह्यात आज एकुण ८७ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेत तर १८३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच्या अहवालात पारोळा आणि चाळीसगाव तालुक्यात रूग्ण संख्या निरंक आढळून आले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर- २५, जळगाव ग्रामीण – ५, भुसावळ- १३, अमळने-१४, चोपडा-१, पाचोरा-२, भडगाव- १, धरणगाव- ३, यावल-१, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-१७, पारोळा-०, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-१, बोदवड-२, इतर जिल्हे -० असे एकुण ८७ रूग्ण आढळून आले आहे.
आजच्या आकडेवारीनंतर जिल्ह्यात एकुण ५२ हजार ९४९ रूग्ण संख्या झाली आहे. यापैकी ५० हजार ५९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर १ हजार ९९ रूग्ण आता उपचार घेत आहे. आज १ रूग्णाचा मृत्यू झाला असून एकुण १ हजार २५९ रूग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९५.५५ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.