धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव येथील कोवीड केअर सेंटरमधून १५ रूग्ण कोरोनामुक्त झाली असून त्यांना आज घरी सोडण्यात आले. यावेळी सर्व कोरोनामुक्त रूग्णांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तर शिवसेना जिल्हाप्रमुख जळगांव गुलाबराव वाघ तसेच नगराध्यक्ष निलेश चौधरी व तहसिलदार नितीन कुमार देवरे यांनी त्यांचे पेढा भरवून कौतुक केले.
गेल्या आठवड्यापासून धरणगाव कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल असलेले १५ रूग्णांनी कारोनावर मात केली आहे. आज त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. सर्वांना पेढे देवून व टाळ्यावाजवून स्वागत करण्यात आली. यात पाळधी-९, बांभोरी-४ आणि धरणगाव २ असे एकुण १५ रूग्ण असून त्यात ४ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. पाळधी बु. येथील रुग्ण नाशिर बशीर पिंजारी यांनी धरणगाव कोविंड सेंटरला अत्यंत चांगली सुविधा मिळत असल्याचे बोलतांना सांगून समाधान व्यक्त केले. या रुग्णांमध्ये हितेश विनोद पाटील रा. बाभोंरी बुद्रुक या चार वर्षाच्या मुलाने देखील कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख जळगांव गुलाबराव वाघ तसेच नगराध्यक्ष निलेश चौधरी व तहसिलदार नितीन कुमार देवरे यांनी त्याचे पेढा देवुन कौतुक केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा शासकीय समन्वय समिति अध्यक्ष गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, तहसिलदार नितिनकुमार देवरे, बी-बियाणेचे मोठे, व्यापारी किशोर डेडिया व सुनिल मालु हे मदत व सहकार्य करण्यासाठी हजर होते. कोविड सेंटरची सक्षमपणे जबाबदारी साबांळणारे नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ यांनी चोक व्यवस्था ठेवली होती, यावेळी धरणगांव मंडळ अधिकारी वनराज पाटील , तलाठी अनिल सुरवाडे, कोतवाल तबरेज खाटीक, अरविंद चौधरी, गोपाल पाटील, गोपाल चौधरी आदी उपस्थित होते.