दिलासादायक : जिल्ह्यात आज १३० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने दिलेल्या कोरोनाच्या अहवालात आज १३० रूग्ण कोरोना बाधित आढळून आले तर आजच २१५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जामनेर तालुक्यात कोरोनाचे रूग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय आजची आकडेवारी
जळगाव शहर- २९, जळगाव ग्रामीण- १०, भुसावळ-१३, अमळनेर-४, चोपडा-४, पाचोरा-१, भडगाव-१, धरणगाव-२, यावल-३, एरंडोल-०, जामनेर-४८, रावेर-६, पारोळा-१, चाळीसगाव-५, मुक्ताईनगर-१, बोदवड-२, इतर जिल्हा-० असे एकुण १३० रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे.

तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर- ११,८५१ जळगाव ग्रामीण- २४९९, भुसावळ-३७९८, अमळनेर-४३४४, चोपडा-४३०१, पाचोरा-१९१०, भडगाव-१८६५, धरणगाव-२१६६, यावल-१७१६, एरंडोल-२७८५, जामनेर-३९७५, रावेर-२१२५, पारोळा-२४६३, चाळीसगाव-३४६७, मुक्ताईनगर-१६७१, बोदवड-८१३, इतर जिल्हा-४२३ असे एकुण ५२ हजार १५१ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ४९ हजार १५० रूग्ण कोरोनामुक्त झाले असून १ हजार ७५५ रूग्ण उपचार घेत आहे. आज २ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकुण १ हजार २४६ रूग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९४.२१ टक्क्यांवर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Protected Content