Home आरोग्य दिलासादायक : जिल्ह्यात आज ६० रूग्ण कोराना पॉझिटीव्ह ; १९३ रूग्ण झाले...

दिलासादायक : जिल्ह्यात आज ६० रूग्ण कोराना पॉझिटीव्ह ; १९३ रूग्ण झाले कोरोनामुक्त


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोनाच्या अहवालात जिल्ह्यातून फक्त ६० रूग्ण आढळले आहे. हे वृत्त जिल्हावासियांना दिलासा देणारे आहे. तर आजच १९३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर – ६, जळगाव ग्रामीण- ०, भुसावळ-३, अमळनेर-१२, चोपडा-१, पाचोरा-०, भडगाव-४, धरणगाव-१, यावल-३, एरंडोल-०, जामनेर-१२, रावेर-६, पारोळा-४, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-३, बोदवड-१, इतर जिल्हा-० असे एकुण ६० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. रिकव्हरीचा रेट हा ९३.९८ टक्क्यांपर्यंत आला आहे. जिल्ह्यात एकुण ५१ हजार ८८९  रूग्ण आढळून आले असून ४८ हजार ७६६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज ३ रूग्णांचा मृत्यू झाला. एकुण जिल्ह्यात १२४१ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता १ हजार ८८२ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.


Protected Content

Play sound