जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अयोध्या नगर येथे दारू पिण्याचे पैसे मागण्याच्या कारणावरून एका मजुराला काका व पुतण्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी सोमवार एक मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन पांडुरंग अंबूरे वय 45 हे हनुमान नगर येथे वास्तव्य आहेत. ते रविवार 30 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आयोध्या नगर भागातील पान टपरी समोर उभे होते. याच ठिकाणी मोहन गायकवाड तसेच त्याचे काका हे दोघे सुद्धा उभे होते. यादरम्यान मोहन अंबुरे यांनी मोहन गायकवाड यांच्याकडे दारू पिण्याचे पैसे मागितले यावरून दोघांमध्ये वाद झाला . यात मोहन गायकवाड याने शिवीगाळ करत मोहन अंबुरे यांच्या डोक्यात वीट मारली तर याचवेळी मोहन गायकवाड याचे काका याने मोहन अंबुरे यांना पोटात तसेच पाठीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत मोहन अंबुरे हे जखमी झाली असून त्यांनी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मोहन गायकवाड व त्याचे काका दोघे रा.अयोध्या नगर या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर हे करीत आहेत.