जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारूचे बिल भरण्याच्या कारणावरून एका तरूणावर जीवघेणा चाकूहल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना सुप्रिम कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी एमआयडी पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अक्षय शांताराम दांडगे हा आईवडील यांच्यासह सुप्रिम कॉलनीत वास्तव्याला आहे. शनिवार १४ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनीतील देशी दारूच्या दुकानात अक्षय दांडगे आणि त्याचा मित्र प्रभाकर उर्फ भूषण भागवत चांदेलकर हे दारू पिण्यासाठी गेले. दोघांनी दारू पिल्यानंतर प्रभाकरने अक्षयला दारूचे बिल भरण्यास सांगितले. त्यावर माझ्याकडे दारूचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने प्रभाकर चांदेलकर याने मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्यावेळी दारूच्या दुकानासमोर अक्षयचा काका गणेश बाबूराव दांडगे हे रिक्षा घेवून प्रवाश्यांची वाट पाहत होते. अक्षय दारूच्या दुकानात गेला आहे हे गणेश दांडगे यांना माहित होते. दरम्यान दारूच्या दुकानातून आरडाओरड सुरू असल्याचे पाहून गणेश दांडगे यांनी दुकानात गेले असता प्रभाकरहा दारूचे बिल भरण्यासाठी अक्षयला जबरदस्ती करत होता. पैसे भरले नाही म्हणून प्रभाकरने त्यांच्या हातातील चाकून अक्षयवर वार करून गंभीर दुखापत करून घटनास्थळाहून पसार झाला. जखमी झालेल्या अक्षयला त्याचे काका गणेश दांडगे यांना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गणेश बाबूराव दांडगे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रभाकर उर्फ भूषण भागवत चांदेलकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.