जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरात दुचाकी चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला दाणा बाजार येथून अटक केली आहे. संशयित आरोपीने आतापर्यंत चोरी केलेल्या १५ दुचाकी काढून दिले आहे. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती डॉ प्रवीण मुंडे यांनी सांगितले.
जळगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ उमेश भांडारकर, किशोर निकम, गजानन बडगुजर, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण, रतन गीते, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी गुरुवारी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी शहरातील दाणा बाजार परिसरात सापळा रचून संशयित आरोपी रोहित तुळशीराम कोळी (वय-१९) रा. चौगाव ता. चोपडा याला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबूली दिली आहे.
संशयित आरोपीने चोरीच्या १५ दुचाकी काढून दिले आहेत. या गुन्ह्याच्या प्रकरणातील त्यासोबत असलेला एक साथीदार फरार आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.