यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील जनता एज्युकेशन सोसायटी दहीगाव व्दारे संचलीत आदर्श विद्यालयाची तंबाखू व्यसनमुक्तीसाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण पक्षातर्फे करिता निवड करण्यात आली आहे.
आदर्श विद्यालयाची या व्यसनमुक्ती अभियानात निवडीनंतर रस्त्याच्या दोघ कडेला व शालेय परिसरात तसेच विद्यालयाच्या प्रवेशव्दारावर व्यसनमुक्ती संदर्भात रस्ते व भिंतीया तंबाखु प्रतिबंधीत क्षेत्र असे संदेश रंगवण्यात आली होती. यानिमित्ताने जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे आरोग्य अधीक्षक तसेच समन्वय समिती सदस्य राज मोहम्मद खान, आदर्श विद्यालयाचे चेअरमन सुरेश पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. नसीम तडवी, मुख्याध्यापक एस. डी.चौधरी, पर्यवेक्षक जी.एस. पाटील, एम.आर. महाजन यांचेसह समन्वय समितीचे सदस्य व शाळेतील शिक्षक वृंद कर्मचारी व ग्रामस्थ मंडळी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.