दहिगाव येथील ग्रामसभेत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन

sabhayyawal

यावल प्रतिनिधी । तालुक्यातीत दहिगाव गावासह संपुर्ण परिसर हा खऱ्या अर्थाने हगणदारी मुक्त झाला पाहिजे. या उद्देश्याने मी तुमच्या गावाला शौचालयासाठी आर्थिक मदत करेल, आश्वासन पोलीस निरीक्षक अरून धनवडे यांनी केले.

दहीगाव येथील आदर्श विद्यालयातच्या परिसरात आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांना दिले. आपले गाव हे हगणदारीमुक्त झालेले आहे असे फलक मला चौकात दिसुन आल्याने आठवण आली. स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाने व महिलांनीही हिरारीने भाग घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपापले स्वच्छालय बांधणे अत्यंत गरजेचे असुन शौचालय नसले तर सार्वजनिक शौचालयात जाणे गरजेचे आहे. उघड्यावर शौचास बसल्याने आपल्या तसेच इतरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो शासनाने दिलेल्या स्वच्छालय लाभाचा प्रत्येकाने लाभ घ्यावा व त्याचा गैरवापर करू नये असे ते म्हणाले. यावेळी गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Protected Content