यावल, प्रतिनिधी । तालुक्यातीत दहिगाव या गावातील हरिभक्त परायण भजनी मंडळ व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीराम जन्मभूमी मंदिर नवनिर्माण निधी अभियान अंतर्गत श्रीराम भक्तांनी पन्नास हजार रुपयांचा निधी लोकवर्गणीतून जमा करून दिला.
अयोध्यातील निर्माणधिन श्रीराम यांच्या भव्य मंदीर उभारणीसाठी दहीगाव येथील हरिभक्त पारायण उद्धव महाराज, हरिभक्त पारायण नामदेव आणि जिल्हा गुरूजी ,परिषदेचे माजी कृषी सभापती सुरेश देवराम पाटील, ग्राम पंचायतचे माजी सदस्य प्रमोद चौधरी जावळे, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक पाटील, हरिभाऊ पाटील, नितीन पाटील, मनोहर महाजन सर, प्रदीप माळी, गुलाब पाटील, लोटन पाटील यांचेसह गावातील भजनी मंडळाने विठ्ठल मंदिरापासून दिंडी सोहळा काढून गावातून प्रत्येकी घर शंभर रुपयेच्या पावती प्रमाणे निधी जमा करून पन्नास हजार रुपये श्रीराम मंदिर बांधकामासाठी जमा करून या धार्मीक कामात आपले योगदान दिलेत. हरिभक्त पारायण उध्दव महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश देवराम पाटील व आदींनी दहीगाव ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.