दहा वर्षीय मुलासमोरच पित्याने घेतली विहिरीत उडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद शिवारातील म्हाळसा देवी मंदिरजवळील विहीरीत १० वर्षाच्या मुलासमोरच पित्याने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना गुरुवारी १५ जून रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. वडील येतील या अपेक्षेने मुलगा विहीरीच्या ठीकाणी अर्धातास उभा राहिला, मात्र वडिल येत नसल्याने शेजारील शेतातील शेतकऱ्यांना मुलाने माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

 

समाधान भास्कर कुंभार (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. समाधान कुंभार हे ममुराबाद येथील पटेलवाडा परिसरात पत्नी ज्योती, मुलगा वैभव व मुलगी राणी सोबत वास्तव्याला होते. समाधान कुंभार यांची ममुराबाद शिवारात विटभट्टीचा व्यवसाय करत होते. अनेक वर्षांपासून ते हा व्यवसाय करत होते.  त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून, जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, विकास शिंदे हे पुढील तपास करत आहेत.

 

सहा तासाच्या प्रयत्नानंतर आढळला मृतदेह

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे विकास शिंदे, माणिक सपकाळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांना आणले. त्यानंतर विहीरीतून मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहीरीत पाणी भरपूर असल्याने सहा तासाचे प्रयत्न करुनही मृतदेह हाती लागत नव्हता. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास विहीरीत मृतदेह आढळला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. रात्री, उशीरा समाधान कुंभार यांच्यावर ममुराबाद येथे अंत्यंसंस्कार करण्यात आले.

Protected Content