जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घर घेण्यासाठी माहेरुन दहा लाख रुपये आणावेत या मागणीसाठी जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात बुधवार, ४ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील माहेर असलेल्या हर्षदा गणेश भगत यांचा विवाह जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील गणेश श्रावण भगत यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर पतीसह सासरच्यांनी पैशांसाठी हर्षदा हिचा छळ करण्यास सुरुवात केली, घर घेण्यासाठी हर्षदा हिने तिच्या माहेरुन १० लाख रुपये आणावेत अशी मागणी पतीसह सासरच्यांनी केली, पाच लाख रुपये घेवून आणखी पाच लाख रुपये आणावेत या कारणावरुन रात्री बेरात्री हर्षदा हिला घराबाहेर काढून देणे, शिवीगाळ करुन टोचून बोलणे तसेच मारहाण करणे असा शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून हर्षदा ही जळगावात रामेश्वर कॉलनी येथे निघून आली. व या छळाबाबत बुधवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन हर्षदा हिचे पती गणेश भगत, सासू शोभा भगत दोन्ही रा. फत्तेपूर ता.जामनेर व नणंद उज्वला अनिल गाढवे रा. औरंगाबाद या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील हे करीत आहेत.