दलित मुलासोबत मुलगी पळाल्याचा संशय ; नातेवाईकांकडून मुलाच्या लहान भावाचा निर्घुण खून

वैजापूर (वृत्तसंस्था) दलित मुलासोबत आपली मुलगी पळाल्याचा संशयातून नातेवाईकांनी त्याच्या लहान भावाचे तलवारीने मुंडके धडापासून वेगळे करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार लाख खंडाळा (ता. वैजापूर) येथे घडली आहे.

 

बाळासाहेब गायकवाड यांचा मुलगा अमोल (२२) १२ मार्चपासून बेपत्ता आहे. शेजारील देवकर वस्तीवरील देविदास छगन देवकर याची २४ वर्षीय मुलगीही बेपत्ता आहे. अमोल यानेच या मुलीला पळवून नेल्याचा संशय देवकर कुटुंबीयांना आहे. त्यामुळे त्यांनी सूडभावनेतून मुलाच्या कुटुंबीयांवर शनिवारी सशस्त्र हल्ला चढविला. यावेळी त्यांनी बेपत्ता असलेल्या तरुणाचा लहान भाऊ भीमराज बाळासाहेब गायकवाड (१७) याचा तलवारीने मुंडके धडापासून वेगळे करून खून केला. या हल्ल्यात तरुणाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी दाेघांना अटक केली असून त्यांच्यावर खुनासह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content