दरेकरांच्या माहितीची किव करावीशी वाटते- खडसे (व्हिडीओ)

जळगाव संदीप होले । विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बीएचआर घोटाळा प्रकरणावरून खडसे यांना काही काम नसल्याची टीका केली होती. याला एकनाथराव खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बीएचआर घोटाळा प्रकरणावरून खडसे यांना काही काम नसल्याची टीका केली होती. याला प्रत्युत्तर देतांना एकनाथराव खडसे यांनी बीएचआर घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश हे भाजप सरकारच्या कालावधीत देण्यात आल्याचे सांगत याला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, भाजपचे सरकार असतांना या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. केंद्र सरकारने हे निर्देश दिले असले तरी राज्य सरकारने ही चौकशी दडपून ठेवली. यामुळे दरेकर यांच्या माहितीची आपल्याला किव करावीशी वाटत असल्याचे ते म्हणाले. तर जलयुक्त शिवार ही योजना चांगली असली तरी यात घोळ झाला असल्याचा आरोप एकनाथराव खडसे यांनी केला.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3419215414792389/

 

Protected Content