मुंबई (वृत्तसंस्था) राज्याच्या दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. राज्यावर चार लाख ७१ हजार ६४२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. महसूली तूट २० हजार २९३ कोटी रुपयांनी वाढली आहे. राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज राज्यविधानसभेत सादर झाला.
महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न एक लाख ९१ हजार ७३७ रुपये असल्याचे अहवालातून समोर आले आहे. विधानसभेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार राज्यावरील कर्जाचा भार तसेच महसुली तूट देखील वाढली आहे. राज्यावर चार लाख ७१ हजार ६४२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. महसूली तूट २० हजार २९३ कोटी रुपयांवर, तर वित्तीय तूट ६१ हजार ६७० कोटींवर गेली आहे. कृषी आणि संलग्न कार्यांमध्ये ३.१ टक्क्यांनी तसेच राज्याच्या विकासदरात ५.७ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.