Home Cities भुसावळ दत्त नगरात गॅसचा भडका ; जीवितहानी टळली !

दत्त नगरात गॅसचा भडका ; जीवितहानी टळली !

0
22

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील श्रीराम नगरातील दत्त नगर भागातील रहिवाशी गणेश मिस्त्री यांच्या मुलाचा रात्री वाढदिवस साजरा करत असतांना घरात गॅस सिलेंडरने भडका घेतल्याने परिसरात धावपळ झाली.या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

सविस्तर वृत्त असे की, श्रीराम नगरातील दत्त नगर भागातील घरमालक नितीन इंगळे यांच्या घरातील भाडेकरू गणेश मिस्त्री यांच्या मुलाचा सहावा वाढदिवस रात्री साजरा करीत होते. यावेळी सुमारे रात्री ९.४० मिनिटांनी घरातील गॅस सिलेंडरने अचानक भडकाघेतला. हे दृष्य पाहताच गणेश मिस्त्री यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पेट घेतलेले गॅस सिलेंडर घेऊन घराबाहेर फेकले. घटनेची आरडाओरड होताच दत्त नगर मंडळातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन पेटलेले गॅस सिलेंडर विझविले. यामध्ये कुठलेही नुकसान झालेले नसून गणेश मिस्त्री कोरकोळ जखमी झाल्याची माहिती परीसरतील नागरिकांनी दिली.


Protected Content

Play sound