थ्रेशरचा पार्ट तुटून तोंडावर लागल्याने तरुणाचा मृत्यू

 

पाचोरा, प्रतिनिधी ! नेरी ( ता. पाचोरा) येथे थ्रेशर मशिनवर मक्याच्या चाऱ्याची कुट्टी करत असतांना थ्रेशर मशिनमधे दगड आल्याने मशिनचा पार्ट तुटून मशिन चालकाच्या तोंडावर लागला त्यात चेहऱ्यावरील नस फाटल्याने या तरुणाचा मृत्यू झाला

नाशिक येथे उपचारासाठी नेत असतांना चांदवड घाटात बनोटी (ता. सोयगाव ) येथील या ३२ वर्षाच्या इसमाचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी दिलेल्या खबरीवरुन पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली गुन्हा शुन्य क्रमांकाने सोयगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

गुरुवारी नेरी येथील शेतकरी निंबा पाटील यांचे शेतात बनोटी येथील रहिवासी गजानन पाटील हे त्यांचे थ्रेशर मशिनवर मक्याच्या चाऱ्याची कुट्टी करत होते. चाऱ्यासोबत दगड आल्याने तो मशिनमधे अडकून मशिनचा पार्ट तुटून गजानन पाटील यांचे तोंंडावर आदळला त्याच्यात ते गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेतच स्वत:मोटार सायकलवरून चाळीसगाव येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले. तेथील डॉक्टरांनी त्यांची परीस्थिती पाहून पुढील उपचारासाठी मोठ्या शहरातील दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिल्याने नातेवाईकांनी त्यांना नाशिक येथे हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र चांदवड घाटात रात्री १२.४५ वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. गजानन याचे शव पाचोरा येथे आणल्यानंतर डॉ. अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.

Protected Content