रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण येथील विहीर अधिग्रहीत करण्याचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी दिल्या आहेत.
याबाबत वृत्तात असा की, तालुक्यातील थोरगव्हाण येथील दोन कूपनलिकांची पाणी पातळी घसरल्यामुळे गावात दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याबाबत माहिती मिळताच तहसीलदार विजयकुमार ढगे , गटविकास अधिकारी एच . एन . तडवी, पाणीटंचाई कक्षप्रमुख अतुल कापडे यांनी गावास भेट देऊन विहीर अधिग्रहणचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना सरपंच व ग्रामसेवकांना केल्या आहेत.
थोरगव्हाण हे सुमारे साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गत पंधरा दिवसापासून दोन ते तीन दिवसाआड गावास पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान कूपनलिकेचे पाणी कमी झाल्यामुळे गावात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे अधिकार्यांनी गावास भेट दिली. जानेवारीत ही स्थिती आहे यामुळे एप्रिल व मे मध्ये तालुक्यात भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे