धरणगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील रेशन दुकानदार आणि दलाल यांच्याकडून गोरगरीब लोकांची होणारी लुट थांबवीण्यात यावी व जे रेशन दुकानदार दोषी आढळून येतील त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनिल माणिक सोनवणे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, धरणगाव तालुक्यात दुकानदार कमी रेशन देतात दुकानदारांकडुन लाभार्थ्यांची फसवणुक होत आहे. लाभार्थ्यांना स्पॉस मशिनची पावती देण्यात येत नाही. दुकानदाराकडे तक्रार रजिष्टर नाही. ल रजिस्टर, स्टॉक रजिष्टर आणि मालचा पावत्या नाहीत. स्वस्त धान्य दुकानाचे मालक हे स्वतः दुकानात थांबत नसून ते माल वाटण्यासाठी दुस्यांच्या हवाले करतात व प्रत्येक रेशन दुकानदाराने दुकानाचा बाहेर नोटीस बोर्ड लावावे त्यात माल शिल्लक व वाटप किती किंवा कोणत्या लाभार्थ्याला किती माल मिळेल फ्रि किंवा इतर योजनेचे माल हे नमुद करावे. अंत्योदयची यादी आणि बीपील पीएचएच आणि केसरी,यांची संपुर्ण यादी लावण्यात यावी. धरणगाव शहरात फक्त दुकानदार दि. २५ ते १ तारीच या कालावधीतच वाटप करतात म्हणजे महिन्याला फक्त ५ दिवसंच वाटप करण्यात येत, शासन नियमांप्रमाणे संपुर्ण महिनाभर चालु असायला पाहिजे असा शासनाचा नियम असल्यावर सुध्दा धरणगाव तालुक्यात यांची मनमानी कारभार चालु आहे. कोरोनाचा पार्श्वभुमीवर लोकांचा हाताला काम नाही. तरी रेशन दुकानदार हे गोरगरीबांकडून नवीन रेशन कार्डसाठी संदर्भात कुठलेही काम असो फ्रि मध्ये करण्यात यावे, परंतु त्या कामासाठी रुपये ३०००/- रूपये ५०००/- घेतले जातात. हेच रेशन कार्ड शासनाकडून फ्रि देण्यात यावेत.अशी ताकीद रेशन दुकानदारांना देण्यात यावी. तरी प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी व सहकार्य करावे. गरीब लोकांची लुट लवकरात लवकर यांबवावी. व जे दोषी आढळतील त्यांचे परवाने रदद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.