जळगाव संदीप होले । ग्रामपंचायतीची वादग्रस्त असलेली जागा नावावर करण्यासाठी पाचोरा तालुक्यातील डांभूर्णी येथील महिलेने गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसली आहे. परंतू हे उपोषण बेकायदेशीर आसल्याचे निवेदन प्रभारी सरपंच संतोष परदेशी यांनी आज शुक्रवार ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे.
सविस्तर माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील डांभूर्णी येथील रहिवाशी प्रतिभा प्रेमसिंग परदेशी या महिला गेल्या तीन महिन्यापासून कथीत वादातून ग्रामपंचायतीचे सरपंच, सरपंच पती, ग्रामसेवक, उपसरंपच व पोलीस पाटील यांना अक्षरश: वेढीस धरले आहे. प्रतिभा परदेशी यांनी पाचोरा पंचायत समिती कार्यालयात आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी दिल्या आहेत. या महिलेचे गावात तिच्या पतीच्या नावावर जागा आहे. जागा असूनही बेकायदेशीररित्या ग्रामपंचातीच्या हद्दीतील जागेचा वापर करून शौचालयासाठी जागा आणि ग्रामपंचायतीची मालकीची ३० बय ८ असे एकुण २६४ चौरस फुट जागेचा ताबा घेण्यासाठी पंचायत समितीचे पत्र असल्याने ती जागा ग्रामपंचायतीने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे ही जागा शासकीय मालकीची असल्यामुळे जागा देता येणार नाही. परंतू सदरील महिला जागा मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३१ ऑगस्ट रोजपासून आमरण उपोषणाला बसलेली आहे. हे उपोषण बेकायदेशीर असल्याने त्यांचे आरोप तथ्यहिन असून सुधदा त्यांच्या हेकेखोर भुमिकेला कायदेशीर पायबंद घालावा अशी मागणी डांभूर्णी येथील प्रभारी सरपंच संतोष परदेशी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून मागणी केली आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/398531974951473